मुंबई गोवा महामार्गवर वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या पोलिसांना गोड सलामी… गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव व्यापारी संघाचे अनोखा उपक्रम…  

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

               गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव व्यापारी संघाने आज माणगाव पोलीस विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत मोदक वाटप केले.मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.–६६) तसेच माणगाव शहर हद्दीत वाहतूक नियंत्रणासाठी गेले आठवडाभर रात्रंदिवस झटणारे माणगाव पोलीस, महामार्ग वाहतूक शाखा, क्षेत्रीय परिवहन विभाग (RTO), होमगार्ड्स, वॉर्डन्स, मार्शल्स व स्वयंसेवक यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. लाखो भाविक कोकणात आपल्या गावी परतत असताना पोलीस व विविध यंत्रणा दिवसरात्र दक्ष राहून सुरळीत व सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी पार पाडले आहे. गणेशोत्सवाचा पहिला दिवस, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजीही हे सर्व पथक महामार्गावर कार्यरत असून भाविकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यासाठी दक्ष आहे. हा उत्सव अखंड आठवडाभर चालणार आहे.

दरम्यान, या उपक्रमाविषयी विचारले असता व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (बाळा) दलवी म्हणाले, “वाहतूक पोलीस सेवेत व्यग्र असल्याने गणेशोत्सवातील गोड पदार्थ मोदक वाटप करण्यासाठीही हा उपक्रम राबविण्यात आली आहे तसेच गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सातत्याने राबवित आहोत.आमचे सदस्य माणगाव शहर हद्दीतील प्रत्येक चौकात व नाक्यवर जाऊन पोलीस बांधवांना मोदक व सुका मेवा वाटप केले आहे.

पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थापनासाठी व्यापारी संघाने दिलेल्या अमूल्य सहकार्य कौतुकाविषयी बाबत विचारले असता बाळा दलवी पुढे म्हणाले, यंदा पहिल्यांदाच शासन व पोलीस प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून रात्रंदिवस काम केले. परिणामी सलग पाच दिवसांपर्यंत वाहतूक कोंडी न होता सुरळीत वाहतूक झाली तसेच कुठेही कोंडी झाला नाही.

तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल मॅडम,जिल्हाधिकारी किसन जावळे, महामार्ग वाहतूक आयुक्तालय, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोहाडे यांच्या उत्कृष्ट समन्वय व नियोजनाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.दरम्यान पार पडलेला मोदक वाटप उपक्रम समयी डी.वाय.एस.पी  पुष्करज सूर्यवंशी, माणगाव पोलीस ठाणे प्रमुख पी आय निवृत्ती बो-हाडे, पोलीस अधिकारी लक्ष्मी किशन जाधव, वाहतूक पोलीस शिपाई, होमगार्डस तसेच दामिनी पथक कर्मचारी ही उपस्थित होते. या प्रसंगी व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (बाळा) दलवी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, विविध प्रकोष्ठांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने सभासद आणि व्यापारी बंधू उपस्थित होते.