दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
खेड येथे कोंकण मराठी पत्रकार संस्थेच्या माध्यमातून उद्योजक, समाजभुषण यांसारख्या अनेक पुरस्कारांनी विविध मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले…
या सन्मान सोहळ्यात सामाजिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल “समाजभुषण” हा पुरस्कार देऊन जनसेवक दापोलीचे माजी नगराध्यक्ष मा. किशोरभाई देसाई यांना गृहराज्यमंत्री मा. योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले…