नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
१४ एप्रिल २०२५, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली… नेरळ येथे सम्राट युवक मंडळ यांनी सामाजिक न्यायाचे प्रणेते,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि दलितांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे डॉ. आंबेडकर यांची नेरळ बाजारपेठ ते सम्राट नगर येथे भव्य डिजेच्या तालवार नाचत गाजत रॅली काढण्यात आली…
स्टेशन रोड येथे सकाळपासून सरबत वाटप करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मोरे यांनी सरबत व पिण्याच्या पाण्याची सोय केली…काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या टीमने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता…डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजातील समता,बंधुता आणि न्याय यासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत…त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत अनेकांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.