अलिबाग रेवस मार्गावर अपघात… कारची मोटारसायकलला जोरदार धडक… अपघातात पतीपत्नी दोघेही जागीच ठार…

0
100

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग रेवस मार्गावर मानीफाटा इथं झालेल्या अपघातात दोघा पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला. इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला धडक देत 500 मीटर पर्यंत फरफटत नेले. विश्वास पाटील आणि कल्पना पाटील अशी मृतांची नावे असून ते अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाने कारची तोडफोड केली असून अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अलिबाग पोलिस घटनास्थळी पोहोचले असून ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.