उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. उरण तालुक्यातील घुतूम या ठिकाणी हा प्रकल्प आहे. बुधवार, दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ५ सुमारास येथे प्रंचड मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार होरपळून गेला. त्याला उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती आहे. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की संपूर्ण धुतूम गाव स्फोटाने हादरुन घरांना तडे गेल्याचे समजते.
स्फोटा बाबतीत इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. चे अधिकारी यांनी मोन व्रत धारण केले आहे. या घटनेची माहिती तात्काळ उरण पोलीस यंत्रणेला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. सिडको, जेएनपीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन स्फोटातील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, या घटने संदर्भात इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पाचे अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगले आहे…
प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धुतूम ग्रामपंचायत सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी या अगोदर उपोषण सुरू केले होते. पोलीसांनी तेव्हा गावकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. आज अशा स्फोटाच्या घटना घडत असतील तर गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जाणार आहेत असा सवाल सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी केला आहे.