उरण तालुक्यातील रस्त्यावर ट्रेलर अपघाताची मालिका सुरूच… भेंडखळ स्मशानभूमीजवळील अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण…

0
122

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यात रस्त्यावर ट्रेलर अपघाताच्या मालिका सुरूच असून शुक्रवारी भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुमारास श्री कृपा ट्रान्सपोर्ट  कंपनीचा ट्रेलर क्रमांक एमएच  ४६ बीएम १८२६ मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार नारायण  एस भोईर यांचा जागीच मृत्य झाला असून ते नविन शेवा गावातील आहेत…

अपघात रोखण्यासाठी प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने अपघाताचे सत्र हे कमी न होता वाढतच आहे… त्यात महसूल विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच आरटीओ, वाहतूक पोलीस  यांचा अथिॅक साटेलोटेमुळे उरण तालुक्यात अनाधिकृत कंटेनर यार्डचे बस्तान वाढत आहे. अशा कंटेनर यार्डमध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांची ये-जा ही रहदारीच्या रस्त्यावर वाढत आहे…तसेच रस्त्यावर असलेले  वजन काटै याचा परिणाम हा अपघातातील निष्पाप तरुणांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या सदस्यांना सहन करावा लागत आहे…

उरणमधील अपघात प्रशासन,वाहतूक पोलीस,आरटीओ राजकीय पक्ष यांना  सोयरसुतक नाही…अपघाताची माहिती उरण पोलिसांना तसेच उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामळे उरणचे रस्ते हे निष्पाप तरुणांच्या रक्ताने माखत असून उरणमधील रस्त्याजवळील अनाधिकृत कंटेनर यार्ड, इतर बांधकामे, भंगाराची दुकाने, बेशिस्त अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी संतप्त प्रवाशी नागरिक करीत आहेत.