वारंवार खंडित विद्युत पुरवठ्याने वीज उपकरणे नादुरुस्त…. महाड शहरात नागरिक संतप्त…. 

0
137

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ) :-

महाड शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसात रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक ठिकाणी विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याचे दिसून येत आहे… त्यामुळे माणसाला नागरिकांच्या तक्रारी अत्यंत वाढत चालले आहेत… रात्री कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत… तीन ते चार वेळा वीज फोटो खंडित होत असून, या प्रकारची वीज वितरण कंपनीकडे चौकशी केली असता, अत्यावश्यक वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती वीज वितरण कार्यालयातून प्राप्त झाली आहे…. आर्थिक बाब नुकसान भरपाई म्हणून वीज वितरण कार्यालयाकडून कोणत्या बाबीची तक्रार होत नसल्याने विशेष महाड शहरातील दादली किंजलगर वानखेडे गावातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने खेडेगावातील व शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत…. हे तर उन्हाळ्याचे दिवस असून, कडाक्याची गर्मी होत असून खेडेगावातील तसेच शहरातील नागरिक अधिक त्रस्त झाल्याने वीजपुरवठा केव्हा केला होता हे  काही सांगता येत नाही…. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते ही मोठी समस्या नागरिकांच्या समोर येऊन बसली आहे…. तरी वीज वितरण कंपनीने त्वरित महाड शहर व खेडेगावातील वीज पुरवठा सुरळीत सुटण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे… वीज पुरवठा सुरळीत न केल्यास नागरिक वीज वितरण कंपनीवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही….