रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
रसायनी येथील ओके एंटरटेंटमेंट कराओके क्लबच्यावतीने नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाल्याने नवोदित कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे…
ओके इंटरटेंटमेंट कराओके क्लबच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यासाठी क्लबचे नरेश देवळेकर यांनी पुढाकार घेतला असून शेखर मते,समीर यादव,फुलचंद लोंढे, विष्णू जोगळेकर, अपूर्वा सोनवणे,प्रार्थना झिंगे,चेतना गोविटे,असे नवोदित कलाकारांची गीत गायनाची सुरेल मैफिल सुंदर रित्या गाजत आहे.नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने नवोदित कलाकार नरेश देवळेकर यांचे आभार मानत आहे.