श्री उसराई देवी वनभोजन उत्सव २०२५ थाटामाटात संपन्न… गावातून वाजत-गाजत उसराई देवीच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान…

0
38

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

पनवेल तालुक्यातील देवळाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री उसराई देवी वनभोजन उत्सव २०२५ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.देवळोली येथील गावदेवी माता उसरण धरणाच्या काठावर व डोंगर माथ्यावर वसलेले आणि भक्तांच्या नवसाला पावणारी दक्षिण मुख श्री उसराई देवीचा वनभोजन उत्सव चैत्र महिन्यात साजरा केला जातो. हा उत्सव दर तीन वर्षांनी साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी हा उत्सव मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ८ वा. देवीचे महामंगल स्नान (सात ठिकाणचे पाणी व सात रंगाची फुले) वाहून करण्यात आला. सकाळी ९:३०वा. गावातून वाजत गाजत उसराई देवीच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले. तदनंतर उसराई देवीचे पूजन व ओटी भरणे कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना देवीचे दर्शनाचा लाभ मिळाला त्यानंतर दुपारी १२ ते ३ दरम्यान वनभोजनाचा लाभ हजारो भावी भक्तांनी घेतला. याच दरम्यान वैजयंती माता भजन मंडळ सावळे गायिका श्रद्धा नितीन माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदर रित्या भजनाचा कार्यक्रम सादर केला. सायंकाळी पाच नंतर उसराई मंदिरातून गावाकडे परतीची मिरवणूक वाजत गाजत निघाली. उसराई देवीच्या उत्सवा प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम दादा म्हात्रे,पनवेलचे आमदार प्रशांतशेठ ठाकूर,मोहोपाडा वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे, पत्रकार आनंद पवार यांच्यासह विविध राजकीय,सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक  क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती दर्शवून उसराई देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उसराई नवतरुण विकास मंडळ देवळोली चे अध्यक्ष उमेश पाटील, देवळोली तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश पाटील, श्रीकांत पाटील गजानन बडवी मोहन गव्हाणकर, भावेश भागीत,उमेश पाटील यांच्यासह सर्व देवळोली ग्रामस्थ माता-भगिनींनी विशेष मेहनत घेतली…