बॅ.अंतुलेंच्या जन्मस्थळ येथून माती कलश नेण्याकरिता प्रारंभ… खा.सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरव रथयात्रा…

0
21

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वैभव कळस):- 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित कोकण महाराष्ट्र गौरव यात्रा राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्टाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्यात आली. या गौरवशाली यात्रेकरिता मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले,म्हसळा तालुका प्रमुख समिर बनकर,महंम्मद मेमन,माजी जि.प. सभापती बबन मनवे,म्हसळा नगराध्यक्ष संजय कर्णिक,भक्ती सावंत,डॉ. मुश्ताक मुकादम,इस्माईल घोले,नाना सावंत,सुनिल शेडगे,भाईजान अंतूले, मुजीब परकार, गुलाम चरफरे आदी अंतुले साहेबांना मानणारे त्यांचे हितचिंतक उपस्थित होते.

म्हसळा तालुका प्रमुख समिर बनकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि महाराष्टाचे जे पवित्र स्थान आहेत..आणि जे राष्ट्रीय पुरुष आहेत अशा ज्या व्यक्तीने देशासाठी व राज्यासाठी बलिदान दिले आणि ज्या महान पुरुषाने महाराष्ट्र घडवीला असे राष्ट्रीय नेते जे मुख्यमंत्री राहिले व कॅबिनेट मंत्री देखील राहिलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए.अंतुले साहेब यांच्या आंबेत येथील मातृभूमीतील पवित्र माती 1 मे च्या आधी घेऊन जाण्यासाठी आज आम्ही येथून घेऊन निघणार आहोत असे सांगण्यात आले…

मुश्ताक अंतुले यांनी सांगितले की,संकल्प एवढेच आहे की या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी न करता त्यांची कायम स्वरूपी आठवण राहिली पाहिजे.आणि बॅ.अंतुले यांनी केलेले काम कार्य हे लक्षात ठेवता हि पवित्र माती महाराष्ट्राच्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तेथे पोहचवण्याचे काम केले जात आहे असे सांगण्यात आले…