उरण शहरात रात्री ८ वाजता ब्लॅक आऊट व रंगीत तालीम.

0
38
उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-

केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनुसार उरण शहरात ब्लॅक आऊट प्रकियेचीची रंगीत तालीम दि ७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता घेण्यात येणार असून त्यादरम्यान उरण शहरातील विद्युत पुरवठा १० मिनिटांसाठी खंडित केला जाणार आहे. त्यादरम्यान नागरिकांनी घरातील इन्व्हर्टर, जनरेटर व प्रकाश निर्माण करणारी रिचार्जेबल उपकरणे आदी वस्तूंचा वापर टाळायचा आहे*. तसेच घाबरून न जाता स्थानिक प्रशासनास सहकार्य करावयाचे आहे. असे आवाहन उरण नगर परिषदने केले आहे.