आदर्श युवा संघटनेचे कार्य कौतुकास्पद प्रसाद पांढरे…

0
31

पेण शिवसत्ता टाइम्स ( प्रदिप मोकल ):-

पेण तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गडब येथिल आदर्श युवा संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वडखळ पोलिस ठाण्यांचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी गडब येथे केले…

आदर्श युवा संघटना गडब या संघटनेचा 36 वा वर्धापनदिन गडब येथे संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे,सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, जिल्हापरिषेदेचे माजी अर्थवबाधकाम सभापती संजय जांभळे गडब सरपंच मानसी पाटील. उपसरपंच मनोहर पाटील, आदर्श युवा संघटनेचे संचालक के. पी. पाटील, अध्यक्ष के.जी. म्हात्रे संघटनेचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते…

वडखळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांना आदर्श युवा संघटने तर्फे त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आदर्श समाजरत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तर गडब येथील गोमाता रक्षक गड किल्ले संर्वर्धक,अभ्यासक यांचा आदर्श समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी १०वी १२वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे  यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मानीत करण्यात आले.आदर्श युवा  संघटना पेण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक नावाजलेले संघटना आहे. संघटनेने आतापर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन स्थानिक स्तरावर न्याय देण्यासाठी प्रयत्न करुन स्थानिक पातळीवर कलागुणांना वाव दिला.विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात व स्पर्धेमुळे अनेकांना मानसन्मान मिळाले आहे. संघटनेने स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन करावे यामध्ये एमपीएससी,युपिएसी सारखें विद्यार्थी घडविण्याचे काम करावे यासाठी लागणारी सामग्री पुस्तके देणार आसल्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या वेळी सांगितले.यावेळी अरुण शिवकर,संजय जांभळे,के.पी.पाटील आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.