रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर महादेव मंदिर येथे दिनांक 2 मे रोजी एका मुस्लिम तरुणाने अन्नपूर्णा मातेवर लघुशंका करून गाभाऱ्यात अश्लील चाळे केले होते. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धर्म रक्षक हिंदू सेना आणि समस्त हिंदू समाजाकडून याच्या निषेधार्थ रोह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. श्रीराम मारुती चौक,नगरपालिका, तीन बत्ती नाका ते पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय असा मोर्चा मार्गस्थ झाला.रोहा तहसील आणि रोहा पोलीस स्टेशन यांना निवेदन देत आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी आणि त्याच प्रमाणे (यूपी पॅटर्न) म्हणजेच आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवून आरोपीचे घर उध्वस्त करावे. अशी मागणी सरकार दरबारी करण्यात आली. यावेळी जय श्रीराम, पाकिस्तान मुर्दाबाद, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणेने रोहा दुमदुमलेला पाहायला मिळाला. या मोर्चाला महिला वर्गासह रोहेकर नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी रोहा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक महेंद्र गुजर समीर भाई सकपाळ माजी नगराध्यक्ष समीर शेडगे , अप्पा देशमुख त्याचप्रमाणे धर्म रक्षक हिंदू सेनेचे अशोक निकम , जयेश छेडा, किरण कानाडे, राहुल गुरव,सुमित रिसबुड तुषार मोरे उत्तम भांड, प्रफुल्ल जंगम, राकेश महामुनी,भाजपाचे रोशन चाफेकर ,शिवसेनेचे सिद्धांत बुटकर,ज्येष्ठ शशिकांत बोंडकर, विनायक पाटील, मार्तंड भांड, सनील इंगवले ,नीलम भांड, अरुंधती पाडसे आदी रोहेकर नागरिक उपस्थित होते…