मोसिन मुजावर विरुद्ध पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल… देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…

0
10

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-  

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहेत…असाच काहीसा प्रकार पेणमध्ये घडला आहे. पेणमधील मुस्लिम समाजाचा मुलगा मोसिन मुजावर याने इन्स्टाग्राम ॲप वरील आयडी वरून इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो,एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे असे देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला. पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत निषेध रॅली काढली… पेण पोलिसांनी याची दखल घेत मोसिन मुजावर याच्यावर भा.न्या.स.कलम 353,1 ख व 353 (2)  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत…