अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग-वडखळ रस्त्यावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे…आयवा ट्रॅकने चारचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात घडलाय…अपघातानंतर अलिबागवरून मुंबईला येणारी वाहतूक २ तास विस्कळीत झाली होती…रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा रांगल्या होत्या…याचदरम्यान माजी आमदार पंडितशेठ पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अलिबागवरून मुंबईला प्रवास करीत होते…वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना देखील २ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला…वाहतूक कोंडीचे वृत्त समजताच घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले…अपघातामुळे वडखळकडे जाणारी वाहतूक काही काळ पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती…जेएसडब्ल्यू कंपनीचे टेम्पो हे अनधिकृतपणे रस्त्यावर पार्किंगसाठी उभे असतात…त्यामुळेच अपघात होण्याची दाट शक्यता असते…जेएसडब्ल्यू प्रशासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे पंडितशेठ पाटील यांनी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते…जेएसडब्ल्यू कंपनीच्या गाडयांनी संपूर्ण परिसर व्यापला असून याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला तसेच स्थानिकांना करावा लागत आहे…राज्यशासनाने हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी पंडितशेठ पाटील यांनी केली आहे…त्यामुळे वाहतूककोंडीपासून नागरिकांची सुटका होईल व दिलासा मिळेल…