गांगवली येथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जन्म खुणाना श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने वज्रलेप…महाराष्ट्रातील गड किल्ले यांच्या कडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष – डाँ.गौवरभाऊ घोडे…

0
41

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

माणगाव तालुक्यातील गांगवली हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती धर्मवीर सभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्म गांगवली या गावात झाला होता…या ठिकाणी छत्रपती थोरले शाहू महाराजाचा जन्म झाला असे सिध्द झाले असून या ठिकाणी महाराणी येसूबाई, छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या जन्म खूणा,पाऊल खूणा ह्या जीर्ण व नष्ट  होत चालल्या असताना या खूणा श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दि.१० मे रोजी श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान  व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा मंदिर संवर्धन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. गौरवभाऊ घोडे यांच्या हस्ते दूध अभिषेक घालून सुरक्षित करण्यात आले…या गावचे ग्रामस्थ विजय तोंडलेकर यांनी गांगवली या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाल्याचे विश्वास दिघे यांना सांगितले. विश्वास दिघे यांनी प्रत्यक्ष गांगवली या गावाला भेट देऊन पाहणी करून इथे असणाऱ्या ऐतिहासिक पुरातन खुणांना वज्रलेपन करण्याचे निश्चित केले.

यावेळी बोलताना डॉ.गौरवभाऊ घोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ऐतिहासिक  गड किल्ले, मंदिरे असून त्याकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रात अनेक गड किल्ले, मंदिरे आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मुघलांनी  काही मंदिरे, किल्ले हे तोडलेले असून  या गडकिल्ले व मंदिरांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. परंतु ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गडकिल्ल्यांकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी जन्मस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ अशी कमानी उभारण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे विश्वास दिघे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी डॉ.गौरवभाऊ घोडे श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, विश्वास दिघे,रघूनाथ दुबळ इनामदार,जयाजीराव बाजी मोहिते,शेखर साने,ज्ञानदेव दाखिणकर,शैलेश दाखिणकर,विजय दाखिणकर,विजय तोंडलेकर,गांगवली ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र दाखिणकर, मानसी तोंडलेकर ,गौतमभबुवा तायडे,तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते…या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव यांनी केले.