पनवेल शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर, दिपक कांबळे):-
शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे व प्रीतम म्हात्रे शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या महिना-दीड महिन्यापासून सुरु होत्या…अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे…शेकापचे मा. नगराध्यक्ष जे एम म्हात्रे. प्रीतम म्हात्रे व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला…शेकापसाठी पनवेल-उरण तालुक्यातून हा मोठा धक्का मानला जातो.उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदान, प्लॉट नं. 6 सेक्टर 12 येथे शनिवार दि.१० मे रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला…लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, ज्येष्ठ नेते हरचंदसिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत, मनुशेठ कांडपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मढवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनिल बहिरा, गणेश पाटील, डी. पी. म्हात्रे, आकाश ठोकळ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजुशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भात गिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल.एल. पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर. डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील, यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँगेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशिल पाटील, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार सुरेश लाड, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रवी भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते… कुठल्याही पदासाठी पुढे न करणारे आणि पक्षाच्या कामात कायम झोकून देणारे जे. एम. म्हात्रे यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापने पनवेल-उरणमधून मोठा जनाधार गमावल्याची चर्चा आहे.