महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाडमध्ये मटका,जुगार,भिंगरूट अशा प्रकारचे व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्याने करून देखील हे व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने याबाबत बारा तासापूर्वी पोलीस व नगरपालिका प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील प्रशासन सुस्त झोपी गेल्याने अखेर दुपारी बाराच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्यात हा प्रयत्न पोलीस प्रशासनासमोर केल्याने पोलिसांनी अखेर सुभाष मोरे यांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला मात्र आता पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आले असून जुगार व मटके तात्काळ बंद करण्याचा निर्णय महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले…
ऐतिहासिक महाड शहर ही छ.शिवाजी महाराज,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत.
महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रतिवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्ष खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी, आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरु करण्यात आली आहेत.
महाड शहरांमध्ये चालू असणाऱ्या . मटका जुगार ऑनलाईन लॉटरी सारख्या अवैध धंद्यान विरोधात कारवाई करा अन्यथा मी आत्मदहन करीन असा १२ तासापूर्वी. महाड पोलीस व नगरपालिकांना प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील प्रशासन गेंड्याच्या कातडीचे बनल्याने अखेर आज दुपारी बारा वाजता महाड शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुभाष मोरे यांनी केला मात्र पोलीस यंत्रणा धावल्याने पुढील अनर्थ टाळला मात्र या निमित्ताने महाड शहर पोलिसांनी महाड शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व सुभाष मोरे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला असून अवैध धंदे बंद करण्याची मोहीम महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले
महाड शहरात सद्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु झाली आहेत. याबाबत गेली कांही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र पोलीस प्रशासनाने याकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला असल्याने याबाबत सुभाष मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासन अखेर अवैध धंद्यांविरोधात आक्रमक झाले आहे…
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपऱ्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरी कडे वळत आहेत.
आपल्या कुटुंबासाठी धडपड करत असलेल्या आदिवासी महिला आणि पुरुष या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने हे व्यवसाय सुरु असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे आमचे कोणी कांही बिघडवू शकत नाही अशी भाषा केली जात आहे. मासेमारी, मजुरी करून दिवसभरात कमावलेले पैसे या मटका आणि भिंगरुट सारख्या खेळांवर उधळले जात आहेत.
महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमधून असलेले कामगार, चालक, मजूर हे दिवसा मेहनत करून कमावतात आणि संध्याकाळी ऑनलाईन लॉटरी, मटक्यावर खर्च करतात. पैसे मिळाले नाही तर त्यांची पावले चोरी करण्याकडे वळतात. बिरवाडी मध्ये जवळपास आठ ते दहा मटका दुकाने असल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली. लोकसंख्या वाढत असली तरी बाजारपेठ छोटी असल्याने हि दुकाने सहज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पडतात. बिरवाडी मध्ये देखील पोलीस कारवाई कुचकामी ठरत असल्याने हे मटका व्यवसायिक आपले कोणी बिघडवू शकत नाहीत या अविर्भावात आहेत…
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी काही दिवसापूर्वी थातूरमातूर कारवाई केली मात्र काही दिवसातच हे मटका व्यवसाय पुन्हा सुरू झाले अखेर महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी यावेळी ज्या ज्या वेळेस अवैध व्यवसाय सुरूच दिसेल त्या त्यावेळेस कारवाई केली जाईल असे सांगितले होते. परंतु अवैध धंदे करणारे मुजोर झाल्याने त्यांना तळ्यावर आणण्यासाठी सुभाष मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व सामान्य नागरिक सुभाष मोरे यांना धन्यवाद देत आहेत…