माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६६) माणगाव शहरातील निर्माण झालेल्या वाहतूक–कोंडीला चुकवत पर्यटक व मालवाहतुकीची वाहने खांदाड मोर्बाच्या तसेच मोर्बा रोड रस्त्यावरील वाहने खांदाड गावाचा मार्ग अवलंबून महामार्ग गाटून बाहेर पडत आहे मात्र हा रस्ता अतिशय अरुंद दुय्यम मार्गावर घुसत आहेत. या वाहन प्रवाहामुळे पूर्वी शांत असलेला एकेरी रस्ता दिवसेंदिवस इंजिनांच्या गडगडाटाने दणाणत असून गावकऱ्यांना अक्षरशः श्वास घ्यायला अवकाश उरलेला नाही. गेले तीन-चार आठवडे ४०-६० किमी/ता. वेगाने धावणाऱ्या ट्रक,टँकर, टेम्पोच्या सततच्या ये-जा दिसत आहे. तर लहान मुले क्रिकेट, लगोरी, सायकल-दोरी मुलांचे सर्व रस्ते-खेळ चालू आहे. मात्र आता या खेळ ला ब्रेक सततच वाहन हॉर्न-गजरात खंडित होत आहे. हे एकीकडे तर दुसरीकडे किरकोळ चूकही जीवावर बेतू शकते, अशी भीती गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर सतत तरळत आहे. मोर्बा रोडच्या अपघाताची धग ताजी असताना खांदाडमधील बालक, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांची सुरक्षितता अधिकच महत्त्वाची बनली आहे. पायाभूत प्रगतीला गावकऱ्यांचा विरोध नाही; मात्र विकासाच्या वेगाशी श्वास गुदमरू नये, हा संतुलन राखण्याचा प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे. अवजड वाहनांना योग्य मार्गावर वळवून, लहान मुलांना सुरक्षित खेळण्या-रस्त्याची मोकळीक देण्यासाठी तातडीची पावले उचलाच,अशा मागण्यांची आर्त हाक आहे.