महाडमध्ये सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा प्रारंभ…

0
9

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आहे… मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला… महाडमध्ये पुर येऊ नये यासाठी नदीतील गाळ उपसण्याचे हे काम केले जात आहे… पावसाळा तोंडावर आला असून पाच ते सहा ठिकाणी पुर्ण क्षमतेने गाळ उपसण्याचे काम केले जाणार असून या करता 20 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आहे.