रामदास आठवलेंची दमण येथील पक्षी संग्रहालयाला भेट… रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणारे रामदास आठवले पक्षीप्रेमी…

0
7

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दमण येथील पक्षी संग्रहालय अविआरीला भेट दिली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणारे ना.रामदास आठवले हेही पक्षीप्रेमी आहेत.त्यामुळे आज त्यांनी दमणच्या पक्षी संग्रहालयाला सहकुटुंब भेट दिली.या पक्षी संग्रहालयात जगातील अनेक देशांचे विविध पक्षी आहेत.पशू पक्ष्यांवर प्रेम करावे निसर्गावर प्रेम करावे,मुक्या प्राण्यांप्रती मनात करुणा असावी असा संदेश नेहमी ना.रामदास आठवले देत असतात.