महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चवदारतळे महाड येथे दिव्यांग बांधवाकरीता विविध शासकीय योजनां बाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात स्वराली कपिल कळमकर हिने भक्ती गित गाऊन केले. त्यांनंतर महिला तालुका अध्यक्ष आरती सुगदरेने प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्याबाबत थोडक्यात माहिती दिली. संघटनेचे महाड पोलादपूर अध्यक्ष फैज हुर्जूक यांच्या अध्यक्षतेखाली पाडपडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा साबळे व मोहसिन दरेखान यांनी केल.कार्यक्रमात महाड पोलादपूर तालुक्यातील ३०० हुन अधिक दिव्यांग बंधू भगिनीचे रायगड जि. प चे विविध योजनांचा फाॅर्म भरण्यात आल.या मेळाव्यात कर्जत येथून उमंग ट्रस्टच्या शारधा मॅडम आल्या होत्या.कार्यक्रम यशस्वि करण्यास कृष्णा लाड, इम्रान सावंत,सनिल जंगम, मिनाक्षी बांदल,सज्जाद देशमुख,आरती सुखदरे,मंजुषा साबळे,मोहसिन दरेखान,सुनिता निवाते,मनोज भऊड, निता धाडवे, शौकत दरेखान,गफूर मापकर,संतोष कालगुडे, नितीन खेडेकर, कल्पना सुतार,दिलीप बामणे,वसंत सुतार यांनी प्रचंड मेहनत घेतली.