महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार,वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असताना रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावामध्ये मध्ये रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली…रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील किल्ले रायगडकडे जाणारी वाहतूक काही ठिकाणी बंद आहे. कारण, कोंझर घाटात रस्ता खचला आहे, ज्यामुळे महाड-रायगड रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने, दापोली-खेड रस्ता देखील बंद आहे. कोंझर घाटात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुशिवभक्तांच्या सुरक्षेसाठी, उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्याची मोहीम राबवण्यासाठी 28 आणि 29 मे रोजी रायगडावरील पायवाट बंद राहणार आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटन विकासाला वाहतूक कोंडीचा अडसर आहे. पर्यटकांना खाचखळगे, खड्डे, अरुंद मार्ग आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ळे रस्ता खचला आहे, ज्यामुळे वाहतूक बंद आहे. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.माणगाव निजामपूर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे असे महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी सांगितले आहे.