म्हसळा शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
म्हसळा तालुक्यात अद्यापपर्यंत एकूण पाऊस 413.00मि.मी तर आजच्या एका दिवसात 300.00 मि.मी.पावसाची नोंद झाल्याची शासकीय नोंद आहे…संपूर्ण तालुक्यात पावसाने हाहाकार उडवलेला असल्याने नुकसानीच्या नोंदी अद्यापही आल्या नसल्या तरी गुरांच्या वैरणी भिजणे, अंशतःघरांचे नुकसान होणे, मोठ मोठे वृक्ष कोसळून वाहतुकीस अडथळा होणे हे प्रकार मोठ्या प्रमाणांत झाल्याचे समजते.शहराला रात्रभर पावसाने झोडपले असतानाच म्हसळा शहरात रात्रीच्या वेळी फार मोठा आवाज होऊन पाऊस पडत होता असे अनेकानी सांगितले. तर म्हसळा शहरात अनेक रस्त्यांवरून गटारे वहात होती. तर पोलीस स्टेशनच्या कार्यालयांत मोठया प्रमाणांत पाणी साचले होते.