रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ… दोन दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच…

0
13

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगडात सलग दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सोसाट्याचा वादळवारा व विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटात पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गावर झाडे कोसळत आहेत,पेण खोपोली मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय. पेण आडोशी मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. तर जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.