माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
नगरपंचायतचे माजी अध्यक्ष व सध्या नगरसेवक पदावर कार्यरत असलेले ज्ञानदेव पोवार यांनी माणगावातील स्वच्छता व नाल्यांची देखभाल यावर मंगळवारी सायंकाळी उशिरा स्वतः लक्ष ठेवून एक आदर्श निर्माण केला.
शहरातील एका महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी कामगारांमार्फत नाल्याची साफसफाई करुन घेऊन लक्ष ठेवले आणि प्रत्यक्ष सहभागही घेतला. विशेष म्हणजे या ठिकाणी दुर्गंधीचा अजिबात त्रास जानवत नव्हता, जे की इतर भागांतील बंद नाले, साठलेलं सांडपाणी आणि वाहतुकीचा अभाव या समस्यांमुळे वारंवार जाणवते. माणगावातील मुख्य बाजारपेठ व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या भागांमध्ये नाल्यांची स्थिती चिंताजनक असूनही, या भागांकडे स्वच्छता अभियानांतर्गत दुर्लक्ष झाले आहे.
या पार्श्वभूमीवर,पोवार ज्या ठिकाणी उपस्थित होते, तिथे नाल्याच्या नियमित वाहतुकीची खातरजमा करताना, फिनाइल, स्वच्छ पाणी, कामगार मार्फत झाडलोट, डिडीटी पावडर टाकत स्वच्छता राखताना दिसले. त्यांनी नालेची नुकसानीची दुरुस्ती देखील करुन घेतली. विशेष म्हणजे, हा मार्ग जवळच्या मंदिरात जाणाऱ्या भक्तांसाठी प्रमुख भाग आहे, आणि पोवार स्वतः श्रद्धेने या मंदिराला भेट देतात, त्यामुळे ते या परिसरात विशेष स्वच्छता राखतात.त्याचवेळी मनोज पवार, माणगाव नगर पं. चे नामनिर्देशित सदस्य, हे देखील त्यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे, दोघांचेही दुकाने या परिसरात असून, त्यांनी त्यांच्या दुकानाभोवतीचा परिसर सदैव स्वच्छ ठेवलेला आहे, ही बाब स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय आहे.
तथापि, याच परिसरात एका ऊसाच्या रसाच्या दुकानामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याची समस्या आहे. पावसाळ्यात दुकान बंद असले तरी तेथून निघणाऱ्या द्रव पदार्थांमुळे परिसरात सडलेला वास निर्माण होतो, ज्याकडे दुकानदार व प्रशासन दोघेही दुर्लक्ष करत आहेत. हा मार्ग बाजारपेठ, मंदिर आणि बस डेपोला जाणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय गर्दीचा असून, नगरपरिषदेला याकडे तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.ज्ञानदेव पोवार यांचे हे कार्य पुन्हा एकदा सिद्ध करते की स्वच्छतेबाबत त्यांचा दृष्टिकोन केवळ कागदावर मर्यादित नसून प्रत्यक्ष कृतीत दिसतो. अशा जबाबदार नगरसेवकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे हे नक्कीच