अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या तीन महत्त्वाच्या स्तंभांना म्हणजेच जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि सी.ओ नेहा भोसले यांना सदिच्छा भेट देण्यात आली.ही भेट सौहार्द,सुसंवाद आणि जिल्हा विकासासाठी असलेल्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक ठरली.जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजप नेते आदरणीय माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांच्यासोबत चित्रा पाटील, कुरकुंडी कोलटेंभीच्या सरपंच सौ. प्रीती पाटील, पेझारीच्या सरपंच सौ… प्राजक्ता म्हात्रे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते…पोलीस अधीक्षक आचल दलाल,सी.ओ नेहा भोसले रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत… प्रशासनाच्या माध्यमातून रायगडात महिला काम करत असल्याचा मला आनंद आहे…समृद्ध आणि सुरक्षित जिल्ह्यासाठी प्रशासन व जनतेच्या प्रतिनिधींचा एक चांगला समन्वय असेल तर चांगलं काम करता येईल असे शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना चित्रा पाटील यांनी सांगितले…