शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस सज्ज… पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची माहिती…

0
7

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी सुरक्षा व स्वागतासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज आहे… असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले… दि. ५ व ६ जून रोजी तारखेनुसार व ८ व ९ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे… या सोहळ्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व जिल्हा प्रशासन यांची नियोजन पर संयुक्त बैठक घेण्यात आली… त्याअनुषंगाने किल्ले रायगडावर पाहणी देखील करण्यात आली आहे… पाचाड व किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टिने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे… लाखो शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी जय्यत तयारी केली आहे… सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पूर्व तयारी करण्यात येणार आहे… दीड हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा बंदोबस्तात सहभाग आहे…