हलाखीच्या परिस्थितीत नेरळच्या रुचिता कराळेची गगनभरारी… रुचिता कराळेला बी.एस.सी. बायो टेक्नोलोजीमध्ये ९९ % गुण…  

0
30

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत नेरळमधीलरुचिता कराळे  या विद्यार्थींनीने चक्क ९९ % टक्के बी.एस.सी. बायो टेक्नोलोजी परीक्षेत गुण मिळवत घर चालवणाऱ्या आईच्या वडिलांच्या कष्टाचं चीजं केलं आहे.नेरळ हद्दीत राहणारी रुचिता नलिनी मंगेश कराळे हिने एप्रिल २०२५ मध्ये सी.एच.एम कॉलेजमधून परीक्षा दिली.तिने बी.एस.सी. बायो टेक्नोलोजी मध्ये ९९ % मिळून कॉलेज तसेच मुंबई विध्यापिठातून प्रथम येण्याचे स्थान पटकाविले आहे.ही आनंदी वार्ता सामाजीक कार्यकर्त्या जोत्सना विरले (भावी सरपंच) व सरपंच महेश विरले यांना समजतास त्यांनी रुचिताच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले व तिला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.