भीषण अपघात: मुंबई-गोवा महामार्गावर बस व रिक्षा समोरासमोर धडकली; चार जण गंभीर जखमी…

0
8

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

मुंबई-गोवा महामार्गावर जुना माणगाव येथील गुरुकृपा हॉटेलजवळ २ जून रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात बस आणि रिक्षा जोरदार धडक झाली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून महाडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.११ सी.एच. ७६४१) आणि माणगावकडून येणारी ऑटो रिक्षा (क्रमांक एम.एच.०६ बी.व्ही. २१९३) यांच्यात पाठीमागून धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अशोक भिकू सोनार (वय ६५), परि अनिल सोनार (वय ११) – हे दोघेही जुने माणगावचे रहिवासी आहेत, तसेच अश्विनी स्वप्नील दळवी (वय ३०) आणि साईसा स्वप्नील दळवी (वय ४) – हे दोघे रचना पार्क, कल्याण पूर्व येथील रहिवासी आहेत. अपघाताचा तपास माणगाव पोलीस ठाण्याचे सपोनी बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.