कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सांडपाणी का रखडले ?… अवकाळी पावसात गटारे तुडुंब भरल्याने पाणी बाहेर…

0
10

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सांडपाणी गटारे पहिल्याच पावसात तुडुंब भरल्याने पाणी बाहेर आले…तसेच साफसफाई होत नाही असे प्रसार माध्यमांद्वारे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने आम्ही जागेवर जाऊन मुलाखती घेऊन खरी हकीगत काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत राहणारे बळीराम कोळंबे, रामचंद्र चहाड व  सरपंच यांनी हे पाणी का तुंबत आहे याबाबत खुलासा केला आहे.

सदरील जागेत एक वर्षाआधीपासून नैर्सगिक नाला होता तो सातबारा वाल्यांनी बंद केला व त्या मुळे पाणी साठत आहे. सरपंच यांनी तहसीलदार व कलेक्टर यांना या संदर्भात पत्र व्यवहार केला आहे परंतु तसे केल्याने त्यांचावर ग्रामपंचायत कार्यालयात जीवघेणाहल्ला  करण्यात आला होता. परंतु लवकरच या गटाराचे काम करू असे सरपंच यांनी सांगितले.