खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर हाळ खुर्द गावाच्या हद्दीत रात्री 11.46 वाजण्याच्या सुमारास एका इनोव्हा कार क्रमांक.MH12DM5015 ने समोरील फॉर्च्युनर कार क्रमांक. MH46CG5757 कारला जोदार धडक मारल्याने भीषण अपघात झाला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चारजण जखमी झाले असून दोन्ही कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुंबईकडून पुणे कडे भरधाव वेगात निघालेल्या इनोव्हा कारने हाळ गावाच्या हद्दीत kmh शाळे समोरील आली असता समोरील फॉर्च्यूनर कारला धडक दिली हि धडक इतकी भीषण होती कि दोन्ही कारचे दरवाजे चपल्याने मोठे नुकसान झाले या अपघात चारजण जखमी झालेची माहिती मिळत आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावरील खालापूर पोलीस, खोपोली येथील अपघातातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक ,स्थानिक ग्रामस्थ अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले तेसच जख्मींतील दोन जणांना एमजीएम हॉस्पिटल तर दोनजणांना सरकारी रूग्णालयात योग्य वेळेत दाखल करण्यात आले..