रोहा तालुक्यात काँग्रेस कमिटीच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम… विविध झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकतेचा संदेश…

0
8

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ जून २०२५ रोजी रोहा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…या कार्यक्रमात अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात श्री. सुनील देशमुख (तालुका अध्यक्ष, काँग्रेस कमिटी), श्री. मारुती फाटक (तालुका अध्यक्ष, पर्यावरण विभाग), श्री. फैसल अधिकारी (तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग), श्री. अशोक कांबळे (चानेरा विभाग अध्यक्ष), श्री.गणेश पवार (धाटाव विभागीय अध्यक्ष),तसेच श्री. समीर बामुगडे,पत्रकार पांडुरंग देशमुख, मंदार फाटक,सुषमा फाटक,भिकाराम सरकले, किरण मोरे यांनी सहभाग घेतला…

याप्रसंगी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकतेचा संदेश देण्यात आला.प्रत्येक मनुष्याने जिवनात एकतरी झाड लावणे त्यापासून ऑक्सिजन निर्मिती जास्त प्रमाणात हाईल दैनंदिन जीवनात ताजेतवाने व आनंदी राहायचे असेल तर वृक्ष लागवड केलीच पाहिजे…ही भविष्यात काळाची गरज आहे,असे श्री मारुती फाटक पर्यावरण अध्यक्ष यांनी प्रतिपादन मत व्यक्त केले…कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुढील काळात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला…