रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
शिवसेना शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनी आज रोहा शहरात पत्रकार परिषद घेत अजित दादांच्या राष्ट्रवादीवर घनाघाती टीका केली आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड प्रकरणात चर्चेत आलेले वाल्मीक कराड असे कित्येक वाल्मीक कराड महाराष्ट्रात राष्ट्रवादी तयार करत असल्याचा घनाघात सुद्धा शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केला.रायगड कर्जतमधील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे हे रायगडमधील वाल्मीक कराड असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर आता यावर प्रत्युत्तर देत शिंदे सेनेच्या रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनी सुद्धा या आरोपाचे खंडन करत रायगडच्या रोहामध्ये सुधा असे अनेक नावे समोर येत असून हे सुद्धा वाल्मिक कराड आहेत असा आरोप लगावलाय.