माणसात सुसंस्कृतपणा असेल तर माणसे आपोआप जोडतात… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो लोकांचा पक्ष प्रवेश…  

0
35

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-   

समाजाच्या व्यापक हितासाठी लोकप्रतिनिधी काम करीत असतात.यासाठी त्यांच्यात सुजनशीलता असणे खूप आवश्यक आहे…संयम व आदरपूर्व वागणूक लोकांना आपलेपणा वाटतो.विकासकामांची मालिका ही तर सुरूच राहणार आहे.परंतु आम्ही आमचा सुसंस्कृतपणा कधी न सोडल्यामुळे पक्षातून सोडून गेलेले लोक पुन्हा पक्षात येत आहेत हा जो आम्ही आमचा सुसंस्कृतपणा कायम ठेवल्यामुळेच लोकांना आमच्याबद्दल आपुलकी आज सुद्धा आहे हे यामधून दिसून येत असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात केले.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक,मुरुड तालुका अध्यक्ष फैरोझ घलटे,रायगड जिल्हा सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष हसमुख जैन,राष्ट्रवादी चे नेते मनोज भगत,माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित कासार,सचिव विजय पैर,मुरुड तालुका महिला अध्यक्ष ऍड.मृणाल खोत,माजी जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार,माजी सभापती स्मिता खेडेकर,आदी सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या पक्ष प्रवेश कार्यक्रमात मुरुड शहरातील माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर व त्यांचे समर्थक,काँग्रेस आय पक्षाचे माजी नगरसेवक विश्वास चव्हाण व  विविध पदाधिकारी व कोळी समाजाचे नेते प्रकाश सरपाटील व त्यांचे समर्थक तसेच मुस्लिम समाजातील लोकांनी शेकडोच्या संख्येने पक्ष प्रवेश केल्याने मुरुड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे.या सर्वांचे पुष्पगुछ देऊन खासदार तटकरे यांनी स्वागत केले आहे.