वाडगावमध्ये प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभ… शाळेच्या शुभारंभासह  विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप…

0
17

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

अलिबाग नजीक वाडगाव येथे बापदेव सामाजिक सेवाभावी संस्था वाडगाव व वाडगाव ग्रा.प.सहकार्याने नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रायमरी इंग्रजी शाळेच्या शुभारंभासह विदयार्थ्यांना मोफत वहया वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

वाडगाव राजिप शाळा येथे मंगळवार दि.10 जुन रोजी सकाळी अकरा वाजता प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभ कार्यक्रमासह वाडगाव मधील सर्वच विदयार्थ्यांना मोफत वहया वाटप, तसेच वाडगाव राजिप शाळा व वैकुठ धाम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला…वाडगाव राजिप शाळेच्या समोरील सभागृहात आयोजीत कार्यक्रमास प्रायमरी इंग्रजी शाळेचे उद्घाटक सरपंच सारिका गणेश पवार व रा.कॉ. अलिबाग प्रभारी तालुका अध्यक्ष व उपसरपंच जयेंद्र का. भगत यांच्यासह प्रमुख अतिथी अलिबाग पं.स. गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी, जि.प. रायगड उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे तसेच हितचिंतक नरेंद्र गोखले, समाजसेवक मंगेश नाईक, वाडगाव राजिप शाळा मुख्याधिपिका सुगंधा पाटील, माजी सरपंच सरिता भगत, वाडगाव ग्रा.प. अधिकारी सोनाली पाटील, वाडगाव ग्रा.प.सदस्य व सदस्या आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग व पालकवर्ग तसेच ग्रामस्थ वाडगाव यांची उपस्थिती होती.