माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
मुंबई-गोवा महामार्गावर ११ जून रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला… कंटेनर क्रमांक NL01,/N 2763 हा माणगाव बाजूकडून महाड बाजूकडे जाणारा भला मोठा कंटेनर माणगाव ढालघर फाटा येथे कोकण रेल्वे ब्रिजलगत असणारा लोखंडी रेल्वे हाईट पोलला धडकला…त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या…
कोकण रेल्वेने लावलेला हाईट पोल मधोमध कंटेनर अडकला होता त्यामुळे माणगाव ते ढालघर येथे रेल्वे हाईट पोल पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती… घटनास्थळी माणगाव वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे दाखल होऊन लोखंडी हाईट पोल कटरने कट करून बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली…