रायगडमधील रोहा तालुक्यात रात्रभर धो-धो पाऊस… कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्याने सखल भागात पाणी…  

0
22

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे सगळीकडे पाणी साचून रस्ते बंद झाले आहेत. अलिबाग, तळा, पोलादपूर,महाड या तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सतत पडत असलेल्या पावसाने रोहा तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.गुरुवारी सकाळी ही जोरदार पाऊस पडत होता.त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रोह्याची कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका नदीवर असलेल्या रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्याने रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आला… पुलावर खबरदारी म्हणून पोलीस व वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे.

रोहा अष्टमी नगर परिषदेच्यावतीने सायरन वाजून नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रभर जोरदार पाऊस पडल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने खबरदारी म्हणून शाळा सोडण्यात आले आहेत. सकाळपासून पाऊस रोहा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.