नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके ):-
धामोते येथील आगरी समाज सभागृहाच्या प्रागणात दि १६ जून २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या जोस्तना महेश विरले यांच्याकडून नेरळ तसेच धामोते गावातील रहिवासी यांच्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्याचे शिबीर संपन्न झाले.या शिबिरासाठी मुंबई येथून प्रसिद्ध नेत्र चीकीसक डॉ. विठ्ठल मोहिते व त्यांची टीम आली होती.५०० हून अधिक नागरिकांनी आपले डोळे तपासून घेऊन ४९८ लोकांना मोफत चास्मे वाटप करण्यात आले.जोस्तना विरले सध्या विविध सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहेत…त्यातील गरजूंना चष्मे वाटप करून मोलाचे कार्य त्यांनी केले असल्याने अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.