रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
आज 21 जून,आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथे सकाळी 7:00 वाजता योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी राहुल कदम यांच्यासहित विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते…