रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
रसायनी पोलीस स्टेशनमधील सुसज्ज असणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते बुधवार (दि२५ ) रोजी करण्यात आले.रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे…सुरक्षेच्या दृष्टीने क्राईम डिटेटकशन लवकर करता यावे शिवाय ३६ गावांवर नजर ठेवण्यासाठी ७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले… याच सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते संपन्न झाले…
यावेळी खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.विक्रम कदम,रेन्युसीस इंडिया प्रायव्हेट लिमेटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री.राजीव रंजन, व्यवस्थापक चंद्रशेखर मेनन,अतिरिक्त पाताळगंगा असोसिएशनचे श्री.सैनी,प्रिया असोसिएशनचे श्री.गुरव,सेटनेट कंपनीचे मिथुन साळुंखे, आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.