शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप कार्यक्रम संपन्न… आद्य नाईक प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम…

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-  

वरदायी चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने,तसेच आद्य नाईक प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून आणि माननीय आमदार मंत्री कु. अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या अंतराचा अडसर दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शालेय शिक्षणात नियमितता, सुरक्षित प्रवास व वेळेची बचत यासाठी सायकलचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अनेक विद्यार्थिनींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता, त्यांना सायकल वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी व त्यांच्या पालकांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.आद्य नाईक प्रतिष्ठानच्या वतीने अमित नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना शिक्षणाच्या दिशेने प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहकार्याचे आश्वासन दिले.

वरदायी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आद्य नाईक प्रतिष्ठान यांचे सामाजिक भान अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. भविष्यात आणखी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अशाच प्रकारे मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली….