
रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महाराष्ट्र राज्यात अल्पवयीन मुलीसोबत महिलावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढत असल्याच्या कारणावरून प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबईपासूनच जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याचे उदाहरण दिलं. रायगड जिल्ह्यात एका दिवशी सहा बलात्कार होत असतील तर महाराष्ट्रातील उर्वरित भागात महिलांची काय अवस्था असेल याचा विचार करावा व राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असताना सरकार शक्ती कायदा का लागू करत नाही,? असा सवाल वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित होता. रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 बलात्कार घडल्याचा दावा खोटा असल्याचे रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी म्हटलं आहे. दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळून लावला असून ही चुकीची माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात सहा बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना आज केला. त्यानंतर, अशी कोणतीच घटना घडली नसून ही संपूर्ण चुकीची माहिती असल्याचे उघड करत रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
रायगडमधील तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर आशा वर्कर्स महिलांनी 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या एका आरोग्य शिबिरात काही मुली या गर्भवती असल्याचे आढळून आले होते. मात्र, त्या वेगवेगळ्या काळातील गर्भवती असल्याची माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
याशिवाय त्या मुलींचे त्या त्या मुलांबरोबर लग्न देखील लाऊन देण्यात आले आहे, अशी माहिती आंचल यांनी दिली. दरम्यान, रायगडमधील घटनांची माहिती देत एका दिवसात 6 बलात्कार ही चुकीची माहिती असल्याच पोलीस अधीक्षकांनी म्हटलं.
या प्रकरणात तळा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, त्या आदिवासी समाजाची इच्छा नसताना देखील एक पॉझिटिव्ह दृष्टीकोन म्हणून आपण हा गुन्हा नोंद केला असल्याचं त्यांनी सांगितलं.