रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-
रोहा ते पडम रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे… अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत… गेली चार वर्ष रेल्वे ब्रिजचे काम रखडले आहे, त्यामूळे प्रवासी रिक्षा चालक वनवास भोगत आहेत… रस्त्यातील खड्ड्यांमुळे रिक्षा, नादुरुस्त होत आहेत… अखेर रिक्षा चालकांचा संयम सुटला असून, रिक्षा संघटनेने थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे… या उपोषणाला शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी विविध सामाजिक संघटने पाठिंबा दिला… यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, राष्ट्रवादी कार्यकर्ते रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष रुपेश मलेकर व नवनीत डोलकर उपस्थित होते…
उपोषणकर्ते रुपेश मळेकर म्हणाले की, मी इथला स्थानिक आहे व रिक्षाचालक आहे, त्यामुळे या रस्त्याचा काय त्रास होतो हे मलाच माहिती आहे … अक्षरशः आम्ही रिक्षा धंदा करावा की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे… तर रेल्वे ठेकेदाराने गेले चार वर्ष उडान पुलाचे काम रखडवलेले आहे… साधे सर्विस रोड यांना करता आले नाहीत, यामुळे आमच्या एका रिक्षा बांधवांच्या पत्नीचा या ठिकाणी अपघातात बळी गेला आहे… असे किती बळी यांना घ्यायचे आहेत, असा संतप्त सवाल रुपेश मलेकर यांनी केला…
यावेळी उपस्थित अधिकारी यांना उपोषणकर्त्याने चांगलेच धारेवर धरले… आधी चार वर्षे रस्ता का झाला नाही याचा जाब अधिकारी यांना विचारला असून, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत, त्यामुळे उपस्थित जनसमुदाय भडकला… त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते… आता केवळ रिक्षावालेच पुढे आलेत, जर हा रस्ता झाला नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे मनोज कुमार शिंदे यांनी इशारा दिला… यावेळी राष्ट्रवादी उपाध्यक्ष नंदूशेठ म्हात्रे यांनी देखील रस्त्याबाबत वस्तू तिथी मांडली…
यापुढील तीव्र आंदोलन हा अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा असेल आणि त्याला अधिकारी जबाबदार राहतील हे लक्षात ठेवा, असे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष लीलाधर मोरे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले… त्याचप्रमाणे जर रस्ता पूर्ण केला नाही तर शिवसेना स्टाईल वापरू असे मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले…