नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसून देखील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.संतप्त नागरिकांनी आज थेठ ग्रामपंचायत कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला. तर प्रशासक व ग्रामसेवक सोमवारी १२ वाजले तरी कार्यालयात अनुपस्थित होते.पाणी विभागाचे प्रमुख विजय भिसे यांनी सांगितले वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणी येत नाही.
गावातील नळयोजना काही कारणास्तव बंद झाली असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाण्यासाठी नागरिकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे,स्थानिक रहिवासी श्री. उमेश भागीत यांनी सांगितले की,ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही…त्यात कचरा उचलण्याचे नियोजन नाही की रिक्षा/टॅक्ससी चालक गावात भरदाव वेगाने गाडी चालवत असतात त्यावर प्रशासनाने नियोजन करायला हवे…
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न व इतर सोई सुविधांचा विचार करून व रिक्षा/टॅक्ससी यांना समज द्यावी अशी पुन्हा मागणी केली आहे… अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे…