रस्त्याचे नाही कुणी पण जबाबदार कोणीच नाही का ? तात्काळ दुरुस्तीची मागणी…

0
10

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव शहरातील एक प्रमुख आंतरिक रस्ता सध्या अक्षरशः धोकादायक अवस्थेत आहे… या रस्त्याचा उपयोग दररोज शेकडो पादचारी, विद्यार्थी, दुचाकीस्वार, शासकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिक करत असताना प्रशासन मात्र गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही… नगर पंचायतच्या हद्दीत असलेला आणि वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रांत आणि तहसील कर्मचारी यांच्या निवास तसेच शाळकरी मुलांच्या रोजच्या वापरातील असलेल्या या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, आता तो अपघातांचा सापळा ठरू लागला आहे… रस्त्यावर उघडे खड्डे, चिखल, साचलेले पाणी, बंद पथदिवे हे चित्र सध्या नागरिकांचे जीवन असह्य करत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण करत आहे. शिवाय हा रस्ता पूर्वी बंद होता, पण मुख्य कचेरी रस्त्यावरील वाहतूक ओझे कमी करण्यासाठी स्थानिकांच्या मागणीनंतर खुला करण्यात आला. आता मात्र तो ‘खुला धोका’ ठरतोय. रस्ता कुणाच्या अखत्यारीत आहे यावर बोट ठेवण्याऐवजी, संबंधित विभागांनी तातडीने खड्डे बुजवून, रस्त्यावर नाली व पाणीनिकासीची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. बंद पथदिवे सुरू करून नागरिकांना भयमुक्त वाटचाल द्या. नागरिक, विशेषतः विद्यार्थी व वृद्धांचे समस्या व जिविताला धोका ओळखून हा मार्ग व्यस्तीत होण्यासाठी तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी बोलतात करताना पादचारी यांनी केली…