चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबीर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते, त्यास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला… शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी हिंगोले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांच्या हस्ते करण्यात आले… चौक ग्रामीण रुग्णालयात नेहमी वेगवेगळे वैद्यकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येतात… हे शिबिर सर्वांसाठी असून मोफत आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ.सविता कालेल यांनी केले… प्रथम अस्थिव्यंग, नेत्र विकार व मानसिक आजार यांच्या रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली… या शिबिराच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तातडीने मिळावे यासाठी चौक ग्रामीण रुग्णालय प्रयत्नशील असून त्यांच्या प्रयत्नाने दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली.यावेळी आरोग्य तपासणी, दंत चिकित्सा, वातावरणातील बदल झाल्याने थंडी, ताप, सर्दी, खोकला यावर देखील उपचार करण्यात आले…. लहान मुलांसाठी देखील तपासणी होऊन त्यांना पौष्टिक आहार देण्यात आला… गरोदर माता यांच्या तपासणी बरोबर रुग्णालयातील दाखल रूग्णांची देखील तपासणी करण्यात आली… ६२ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले…. दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी अलिबाग येथे जावे लागते, त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात… हे शिबिर आयोजित केल्याने दिव्यांग यांचा फायदा झाल्याचे दिव्यांग रुग्णांनी सांगितले…. चौक येथील आरोग्य सेवा अतिशय चांगली असून नियमीत डॉक्टर उपलब्ध होणे, तत्पर सेवा देणे, दाखल रुग्ण यांना मोफत जेवण देणे, आरोग्य सेवक तातडीने दखल घेतात, गरोदर महिला यांची नियमीत तपासणी, सुलभ बाळंतपण यामुळे येथे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे…. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याणी हिंगोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सविता कालेल, डॉ.विजय म्हसकर, नेत्र चिकित्सक डॉ. सिद्धी डोंगरे, डॉ. समृद्धी दलाल, दंत चिकित्सक डॉ. राजन यादव, समाजसेवक अमित राऊत, सुशील साईकर, प्रतिमा फडतरे, विशाल भांडुर्गे आदी मान्यवरांनी रुग्णांची तपासणी केली… चौक ग्रामीण रुग्णालय येथील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले….