वर्सोवा किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेचा जल्लोष… समुद्राशी नातं जपणारा कोळी बांधवांचा पारंपरिक उत्सव…

0
13

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-

         अंधेरीतील वर्सोवा–कोळी बांधवांसाठी श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा मिलाफ असलेली नारळी पौर्णिमा आज समुद्रकिनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच कोळीवाड्यांमध्ये सणाची लगबग सुरू होती.नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी समुद्रदेवतेला ‘सोन्याचा नारळ’ अर्पण करून वर्षभर मच्छिमारी करताना कोणतेही विघ्न येऊ नये, तसेच भरपूर मासळी मिळावी, अशी प्रार्थना केली. मानाची पालखी पारंपरिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत समुद्रकिनारी नेण्यात आली. तेथे पूजा, आरती व सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या सोहळ्यामुळे वर्सोवा किनारा भक्तीभाव, रंगतदार मिरवणुका आणि पारंपरिक गीतांनी दुमदुमून गेला होता. कोळी बांधवांसाठी हा सण केवळ धार्मिकच नव्हे तर समुद्राशी असलेल्या नात्याचा उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली..