श्रीवर्धनची आगळीवेगळी परंपरागत नारळी पौर्णिमा… वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने सर्वजण समुद्र किनाऱ्यावर प्रस्थान…

0
7

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-

श्रीवर्धन येथे गेली अनेक वर्षे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो.प्रथेनुसार श्रीवर्धन येथील ज्येष्ठ समाजसेवक कै.विनायकभाई मापुस्कर यांच्या घरी सजविलेल्या पाच नारळांचे मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले.हे पूजन प्रथेनुसार उप विभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे,तहसिलदार महेंद्र वाकलेकर,मानकरी शेट्ये,कुळकर्णी व अन्य मानक-यांकडून मंत्रोच्चारात व विधीवत करण्यात आले.तेथे उपस्थित मानक-यांना मानाचे फेटे व सफेद टोप्या परिधान करण्यात आल्या.पूजेनंतर आरती होऊन मानाचे विडे देण्यात आले.यानंतर कै.विनायकराव मापुस्कर यांचे पुत्र अजित मापुस्कर यांनी या पारंपारिक कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली.उप विभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे,तहसिलदार महेंद्र वाकलेकर ,प्रांत ऑफिसर महेश पाटील ,पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने सर्वजण समुद्र किना-यावर गेले.तेथेही विधीवत श्रीफळांचे विधीवत पूजन होऊन ती भक्तीभावाने सागरास अर्पण करण्यात आली.तत्पूर्वी समुद्र किनारी चॅम्पियन्स कराटे क्लबचे प्रशिक्षक रितेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठीची अत्यंत प्रेक्षणीय प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
कै.विनायकभाई मापुस्कर यांचे नंतरही त्यांचे चिरंजीव अजित मापुस्कर, अशोक मापुस्कर ही परंपरा पुढे चालवीत आहेत ही उल्लेखनीय गोष्ट आहे.