पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आदिवासी समाजाचा मतांसाठी वापर केला जातो… निवडणूक आली रे आली की आदिवासी समाज बांधवांची आठवण होते.पण आता समाजातील नवी पिढी शिक्षणाने समृद्ध झाली आहे.समाजाचा वैचारिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हक्काचे व्यासपीठ समाजभवन हवे आहे.यासाठी आजच्या या जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अनुषंगाने समाजबांधवाची एकच मागणी आहे…ती म्हणजे वर्षभरात आदिवासी समाजभवनाची निर्मिती करावी अशी रोखठोक मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर हिराजी काष्टे यांनी करुन आदिवासी समाजाचा रोखठोक प्रतिपादन आवाज बुलंद केला आणि त्याचबरोबर सूचक इशारा ही दिला असं झालं नाही तर आमच्या समाजाचा पाठिंबा विसरा असे उपस्थित खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवीशेट पाटील यांच्या समोर करुन धम्माल उडवून दिली..
आज जागतिक आदिवासी अस्मिता दिनी…आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विश्वास वाघ,पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा, रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरेश वीर, सचिव जनार्दन भस्मा, रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा,भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी,दिनेश खैरे आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी सकाळी १०.३० वाजता पेण महात्मा गांधी मंदिरापासून निघालेली आदिवासी समाज बांधवांच्या रॅलीत समाजातील परंपरा संस्कृती पेहराव वाजंत्री एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणा देत रॅली पेण शहरात फिरुन पेण खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन सभागृहात विसावली त्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर होऊन मान्यवर मंडळीची भाषणं आणि नंतर आदिवासी आश्रमशाळा व समाजातील युवा युवतीचे सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य सायंकाळी ५.३०वाजेपर्यत सादर करण्यात आली…